सध्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला वाचल्यावर नक्की काळेल. तेव्हा आवर्जून पूर्ण लेख वाचा. सांगणे सोपे असते आणि ते करणे तितकेच सोपे असते! आपले मन आपण उगाच अनेक दिशां मध्ये पळवत असते. एका वाक्यता सांगायचे तर चिकाटी आणि अनुशासन हिच यशाची गुरु किल्ली आहे.जर तुम्हाला तुमची दिनचर्या थकवणारी वाटत असेल, तर कृपया ही दिनचर्या करून पहा. घरात एका व्यक्तीने ही दिनचर्या सुरू केल्यास, संपूर्ण घर आपोआप ती सुरू करते. मध्ये तुमचे काही दिवस चुकतील, पण पुन्हा दिनचर्या सुरू करा आणि जमेल तितकी ती अंगी बळगा. अगदी लहानां पासून ते मोठ्यानं पर्यंत सगळ्यांनीयात सहभागी व्हायला पाहिजे. सर्वप्रथम असा विचार करा की, तुम्ही निरोगी, यशस्वी आणि आनंदी होऊ इच्छिता, ही एक प्रकारची manifestation प्रक्रिया आहे. जर तुम्ही हा टप्पा तुमच्या मनात पक्का करू शकलात, तर बाकी सर्व काही आपोआप जुळून येईल. तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल किंवा घरून काम करत असाल, तुम्हाला शिस्त ही पाळावीच लागेल. सुरुवातीला क्रमचय आणि संयोग चालवून बघायला वेळ लागतो, पण अखेरीस थोड्या प्रयत्नांनंतर तुम्हाला जाणवेल की आता ते काम करत आहे. सुरुवातीला तुम्हाला बरेच पर्याय दिसतील आणि तुमच्याकडून अनेक चुका होण्याची शक्यता असेल. पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमची ट्रेन रुळावर येत आहे. मी वाहन आणि उड्डाणाचे उदाहरण देईन. या दोन्हींमध्ये ऑटो पायलट आणि क्रूझ कंट्रोलचा पर्याय असतो. अनेक वेळा बदल केल्यानंतर, जेव्हा तुम्हाला वाटेल की पॅरामीटर्स स्थिर झाले आहेत, तेव्हाच तुम्ही त्यांचा वापर करता. हि यशाची गुरुकिल्ली तशीच आहे!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी हा एक संयुक्त प्रयत्न आहे. तुम्हाला अन्न, ते खाण्याची वेळ, ते खाण्याची पद्धत आणि त्याच्याशी संबंधित भाग बदलावे लागतील. घरून वर्क फ्रॉम होम असेल तर कामाचे वेळापत्रक पाळा. कमी वेळ पण काम करू नका. किंवा ज्यास्त वेळ पण काम करू नका. तुमचा स्क्रीन टाइम आणि क्रिएटिव्ह टाइम या मध्ये संतुलन बनवून ठेवा. तुमची प्रगती तुमच्या क्रिएटिव्ह टाइम वर आधारित असते. किती वेळ तुम्ही मनोरंजनावर घालवता आणि किती वेळ तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हेलप करण्यावर घालवता या वर तुमची प्रकृती व यश निर्धारित राहील. नारोगी शरीर आणि प्रसन्न मन हे तुमच्या सुधृढतेचे आधार स्तंभ आहेत. कोणत्याही परिस्थितीचे दोन भाग असतात. एक समस्या, दुसरी निरसन. तुम्ही ठरवा कि तुम्ही कोणती परिस्थीचा निवड केला आहे. एका चर्चे मध्ये जर ५ लोक सहभागी असतील आणि एका समस्ये वर निदान शोधात असतील. तर त्या चर्चेत पाचही व्यक्ती योग्य निदान देऊ शकतील. मग नेमकं कोणतं निदान वापरावे. असे असंख्य प्रश्न दिवसभर चालू असतात. त्यामुळे सकाळची दिनचर्या संपवून सकारात्मक भूमिकेची कामे करावीत. सकाळी ०८:३० वाजेपर्यंत नाश्ता झालेला असला पाहिजे. त्यानांतर भूख लागल्यास ११:०० च्या सुमारास एखादे फळ किंवा ड्राय फ्रुटस खावेत. लहान मुलांना चिप्स, भिस्कीट, कोला, थंड पेय, कोणताही गोड पदार्थ किंवा पेय देऊ नयेत. पॅकेज मधील पेय पाधारत देऊ नयेत. त्यामुळे त्यांची भूक भागते व जेवणाच्या वेळी त्यांना भुख लागणार नाही. १२:००-०१:०० च्या दरम्यान जेवण जेवले पाहिजे. जोडलेल्या तळ हातावर मावेल एवढीच भूक आपल्याला असते. कोणीही जर नाश्ता आणि जेवण या मधल्या वेळेत, प्रमाणा बाहेर चर काम केले तर तुमची जेवणाच्या भुकेचे संतुलन बिघडते.
जेवणा/आहारात मध्ये काय असले पाहिजे?
आयुर्वेदा नुसार जेवणामध्ये 0६ रस असणे फार गर्जेचे आहे.
गोड, अंबट, मीठ, तिखट , कडू, तुरट
आज काल जेवण हे कॅलरी मध्ये मोजले जाते. अमुक प्रोटीन अमुक कार्रब आणि त्याचे एप/आप. पाश्चिमात्य देशांतल्या जेवणाच्या पद्धती आपल्या कडे येत आहेत आणि सोबत त्यांच्या औषधांचा बिझनेस होत आहे. त्या उलट पक्षचिमात्य लोक आपल्या पूर्वापार पारंपरिक पद्धतींचे अनुकरण करत आहेत. जेवण किती हि न्युट्रीसीएसशिअस असलं तरी बराच वेळ चाऊन लाळ मिसळुन जे अन्न गिळलले जातं त्याच अन्नाचे योग्य रित्या विघटन/पाचन होते. जेवणाचा घास चघळताना, लाळ, अन्ना मधले घटकाचे मूल्यमापन करते. या क्रियेमध्ये लाळे द्वारे मेंदूला निर्देश पाठवले जाते. या निर्देषशा नुसार मेंदू पाचक द्रव्ये पोटात तय्यार करून ठेवते. त्या मुळे अन्नाचा वास घेणे, व बराच वेळ चावुन खाणे हि योग्य पद्धती आहे. प्रक्रियेची क्रमवाली अशी आहे. पहिले जेवणाकडे नीट बघणे. त्याचा नीट आस्वाद घेणे. योग्य क्रमात खाणे आणि खाताना ०६ रसांचा योग्य मिश्रण करणे. या विषयावर माझा सखोल ब्लॉग प्रकाशित आहे व व्हिडीओ सुद्धा लवकरच येणार आहे. मी त्या लेखाची लिंक या ब्लॉगच्या शेवटी देईन.
मराठी संस्कृती आणि आयुर्वेदानुसार, आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर शरीरातील सात धातूंमध्ये होते. या प्रक्रियेला पचनचक्र म्हणतात.
रसापासून शुक्रा पर्यंतचा हा प्रवास खालीलप्रमाणे अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया:
१. रस धातू (ज्युस / प्लाझ्मा)
- प्रक्रिया: आपण खाल्लेल्या अन्नाचे पोटात पूर्ण पचन झाल्यावर जो पहिला पौष्टिक द्रव (Nutrient fluid) तयार होतो, त्याला ‘रस’ म्हणतात.
- कार्य: हा रस शरीरातील सर्व पेशींना पोषण आणि ऊर्जा देतो.
२. रक्त धातू (रक्त / Blood)
- प्रक्रिया: रस धातूवर जेव्हा ‘पाचक अग्नी’ प्रक्रिया करतो, तेव्हा त्यापासून ‘रक्त’ तयार होते.
- कार्य: रक्त शरीरातील सर्व भागांना ऑक्सिजन आणि जीवनशक्ती पुरवते.
३. मांस धातू (स्नायू / Muscles)
- प्रक्रिया: रक्ताचे नीट पचन आणि पोषण झाल्यानंतर त्याचे रूपांतर ‘मांस’ धातूमध्ये होते.
- कार्य: हा धातू आपल्या शरीराचे स्नायू बनवतो आणि शरीराला ताकद व आकार देतो.
४. मेद धातू (चरबी / Fat)
- प्रक्रिया: मांस धातूच्या पुढील पचनातून ‘मेद’ म्हणजेच शरीरातील आवश्यक चरबी किंवा स्नेह तयार होतो.
- कार्य: मेद धातू शरीराला वंगण (lubrication) देतो आणि शरीराचे तापमान टिकवून ठेवतो.
५. अस्थी धातू (हाडे / Bones)
- प्रक्रिया: मेद धातूवर जेव्हा शरीराचा अंतर्गत अग्नी प्रक्रिया करतो, तेव्हा त्यातील कडक भागातून ‘अस्थी’ म्हणजे हाडे तयार होतात.
- कार्य: अस्थी धातू आपल्या शरीराला मुख्य सांगाडा (Structure) देतो आणि शरीराला उभे राहण्याची शक्ती देतो.
६. मज्जा धातू (Bone Marrow & Nervous System)
- प्रक्रिया: अस्थी धातूचे (हाडांचे) पचन होऊन त्यातील अंतर्गत अग्नीच्या प्रक्रियेतून ‘मज्जा’ धातू तयार होतो.
- स्वरूप व स्थान: हा धातू हाडांच्या पोकळीमध्ये (Bone Marrow) आणि आपल्या मेंदू तसेच मज्जासंस्थेमध्ये (Nervous System) असतो.
- कार्य: मज्जा धातू हाडांना आतून पोषण देतो आणि मजबूत ठेवतो. तसेच आपल्या मेंदूची कार्यक्षमता आणि मज्जातंतूंचे (Nerves) आरोग्य यावरच अवलंबून असते.
७. शुक्र धातू (Reproductive Tissue / Vital Energy)
- प्रक्रिया: मज्जा धातूच्या अत्यंत सूक्ष्म पचन आणि शुद्धीकरणातून शरीरातील सर्वात शेवटचा आणि शक्तिशाली धातू ‘शुक्र’ तयार होतो.
- कार्य: हा धातू पुनरुत्पादनासाठी (Reproduction) कारणीभूत असतो. पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही हा धातू शरीराची प्रतिकारशक्ती, तेज, कांती आणि मुख्य जीवनशक्ती (Vital Energy) टिकवून ठेवण्याचे काम करतो.
थोडक्यात सांगायचे तर: तुम्ही खाल्लेले अन्न आधी रस बनून संपूशरीरात पसरते, मग त्याचे रक्त होते, रक्तापासून मांस बनते, मांसापासून मेद तयार होतो, मेदापासून तुमची हाडे (अस्थी) मजबूत बनतात. अस्थींपासून हाडांमधील मज्जा (मज्जा धातू) तयार होते, आणि शेवटी मज्जेपासून शरीरातील सर्वोच्च ऊर्जा आणि पुनरुत्पादक शक्ती असणारा शुक्र धातू निर्माण होतो. हे चक्र सतत २४ तास शरीरात सक्रिय असते.
ओजस
जेव्हा हे सातही धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र उत्तम प्रकारे तयार होतात, तेव्हा या संपूर्ण पचनक्रियेचा शेवटचा अर्क म्हणजेच ओजस तयार होतो. ओजस म्हणजे शरीराची खरी रोगप्रतिकारक शक्ती आणि चेहऱ्यावरील आत्मिक तेज.
तुम्ही करत असलेल्या ध्यान (Meditation) साधनेमध्ये स्थिर राहण्यासाठी शरीरात या ओजसची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक असते.
या संपूर्ण अन्न पचन चक्राला शरीरात पूर्ण होण्यासाठी साधारण ३० ते ३५ दिवसांचा कालावधी लागतो.
ऋतुमान पाहून योग्य आहार करणे गरजेचे आहे.घरातील सर्व व्यक्तींनी स्वयंपाकघरात योग्य रित्या योगदान करणे गरजेचे आहे. स्वयंपाका च्या तय्यारी पासून ते भांडी स्वच्छ करून लावण्या पर्यंत सर्व कमान मध्ये तुमची मदत असणे गरजेचे आहे. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते भाजीपाला स्वच्छ करणे, भिजवणे किंवा पीठ मळण्यापर्यंत. ज्या कोणत्याही मार्गाने शक्य असेल त्या मार्गाने योगदान द्या. जेणेकरून घरातील एका व्यक्तीवर कुठलाही भार पडणार नाही. वस्तू घेऊन जागच्या जागी परत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याची सवय लावा. या साठी दिवसातून कमीत कमी ३ वेळा ध्यान साधना केली पाहिजे. पसारा मांडून विखुरलेला अवतार किंवा विचलित मनः स्थिती ही मेंदूच्या अस्थिरतेची लक्षणे आहेत. ध्यान साधना 0३ वेळा म्हणजेच सकाळी व्यायामाच्या आधी. दुपारी जेवण्याच्या आधी आणि रात्री झोपण्या आधी करणे योग्य आहे. ध्यान साधनेला यापेक्षा ज्यास्त वेळ दिला तरी चालेल. या वर सखोल व्हीडिओ प्रकाशित आहे आणि ब्लॉग लवकरच येणार आहे. मनः शांती केल्याने तुमची तुमचे विचार सुसंघटित होतात. सुरुवातीला तुम्ही तुमची ऊर्जा बॅलन्स नाही करू शकणार. संध्याकाळ होता होता थकून जायला होईल. पण नियमित अभ्यास केल्यास तुमचे आत्म संतुलन होऊ लागेल. 0३ महिने नियमित ध्यान साधन दिवसातुन 0३ वेळा दररोज केली तरी तुम्हला स्वतः मध्ये असंख्य बदल घडलेले दिसू लागतील. उदाहरणार्थ वेळेवर भूक लागणे, वेळेवर झोप येणे, चिडचिडेपणा कमी होईल, लहान मुलांची चंचलता कमी होईल, वयोमान नुसार गेलेला स्वतः वरचा आत्मविश्वास पुन्हा जागृत होऊन बळकट बनेल, सकाळी झोप पूर्ण होऊन फ्रेश, बिना अलार्मच्या उठला जाईल. सबंध दिवस ऊर्जा राहील, सगळ्यात महत्वाचे मनानी ऐकण्याची शक्ती वाढेल, स्वभावात शांतता आणि सकारात्मकता वाढेल, एकाग्रता शक्ती बळकट बनेल, अचानक तुमचे शरीर मलून पडलेल्या झाडाला पाणी घातल्यानंतर जसे टवटवीत दिसते, तसे दिसू लागेल, कोणत्याही विपरीत परिस्थितीत भांबावून न जाता शहंतपणे विचार करुन योग्य मार्ग स्वतः शोधू शकाल. नुसता ध्यान साधनेने इतके आरोग्य कमवू शकता. तर ध्यान साधना घरातील सर्व व्यक्तींनी नक्की करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचे घर सुदृढ व आरोग्य दाई बनवा.
सुरवात 0५ मिनिट शांत पणे एका ठिकाणी बसुन राहा. सुरुवातीला शारीरिक हालचाल तुम्हाला विचलित करतील. दुसऱ्या टप्प्यात अजु बाजू चे आवाज, वास, धड धड, तुमचे ध्यान विचलित करेल. तिसरीर टप्प्यात या सर्व गोष्टी तुम्हीदुर्लक्षा करु शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतः च्या मानत शिरू शकाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल कि किती सारा गोंगाट आत मध्ये चालू आहे. हा टप्पा किंवा हि पातळी सर्वात अवघड आहे. बरेच जण या टप्प्या वर येऊन ध्यान साधना सोडून देतात. ध्यान साधना सोडणाऱ्यांच म्हणन एकच असतं. जास्त विचार मनात येतात. अस्वस्था वाढते. बर्याच वेळा दिवस संपता संपता तुम्हाला ज्यास्त थककवा येऊ लागला आहे. हो असे होणे नैसर्गिक आहे. कारण जेव्हा तुम्ही ध्यान साधना सुरु केली आहे. तर तुमच्या मानाने रिकामी खोली निर्माण करणं सुरु केली असते. रिकामी खोली होताच तुम्ही जास्त विचारांनी ती खोली भरत राहता आणि जास्त विचार केल्यानी तुम्ही थकून जाता. या साठी झोपण्या आधी ध्यान साधना करणे खूप आवश्यक आहे आणि शक्य असल्यास श्वसनाचे व्यायाम देखील करा.
सुरवात 0५ मिनिटां पासुन केली आहे तर हळू हळू १० मिनिटांपर्यं वेळ सुद्धा वाढवा. मनातील विचारांचे चक्र निरंतर चालू राहते. शरीर काम करणे बंद केले तरी मन कायम काम चालू राहते. म्हणून ध्यान साधना हे सर्वात अवघड आणि सोपा व्यायाम आहे. हळू हळू तुमची ध्यान साधनेची वेळ वाढवत ३० मिनिटा पर्यंत वाढवा. लहान मुलांना ध्यान साधना शिकवणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. ध्यान साधनेसाठी कोणता हि सपोर्ट घेऊ नका. बरेच जण एखाद आवडतं संगीत किंवा धुन लावून ध्यान धारणेचा अभ्यास करतात. याचा अर्थ असा होतो कि मी चालू शकतो पण धावण्यासाठी मी कुबडी चा वापर करतो. मग नेमकं काय करायला पाहिजे या ध्यान साधने मध्ये? अगदी सोपं उत्तर आहे.
पाठीचा मणका ताठ ठेऊन, एका ठिकाणावर बसुन राहायचे. डोळे मिटायचे. त्यानंतर स्वतःच्या श्वसनावर ध्यान लावायचे, म्हणजे काय. नैसर्गिक रित्या आपला श्वास कसा आत बाहेर चालला आहे हे अनुभवायचे. इथे श्वसनावर नियंत्रण नाही करायचे. सुरुवातीला अनेकदा. तुम्ही प्रापंचिक विचार चक्रात पुन्हा पुन्हा पडू शकता. पण पुन्हा मन श्वसना वर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. बरेच मेडिटेशन शिकवताना तुम्हाला तुमचे डोळे मिटून सुंदर निसर्गाची कल्पना करण्यासाठी निर्देश देतात. पुन्हा तेच. ध्यान साधना कोणत्याहि सपोर्ट बिना करावी. कारण एकदा जर तुम्हाला सुपोर्ट ध्यान किंवा मेडिटेशन ची सवय पडली तर तुम्ही तीच धरून चाललं. श्वसना वर ध्यान केंद्रित करून ध्यान साधना केल्यास त्याचे परिणाम सुद्धा तसेच असतील. सुरवातीला तुम्ही फक्त तुमच्या श्वसना वर ध्यान करण्याचा प्रयत्न करा. नियमित अभ्यासामुळे आजूबाजूला गजबजाट जरी असला तरी कुठेही ध्यान साधना करू शकता. कोणालाही कळणार सुद्धा नाही. श्वसनावर ध्यान करत अस्ताना पुढच्या टप्पया मध्ये तुमचा श्वास नैसर्गिक रित्या खूप खोल होत जाईल. खुप हळू होईल. एक वेळ अशी येईल कि तुम्हाला वाटेल कि तुम्ही खूप हळू आणि दीर्घ श्वास घेत आहेत. हे श्वास सोडताना सुद्धा अनुभवता येईल. श्वास आत घेण्यापेक्षा बाहेर सोडण्यास जास्त वेळ लागेल. हा श्वास इतका हळू होईल कि तुम्हाला एका टप्प्यावर असं वाटेल कि तुमचा श्वास पूर्ण पणे थांबला आहे. हा क्षण तो आहे, जिथे तुमचे विचार सुद्धा स्थिरावले असतील. वर्तमान आणि भूतकाळाचे विचारही स्थिर होतील.हाच क्षण दीर्घ काळ टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा आहे तुमचा मेडिटेशन पॉईंट. इथे तुम्हाला एक खूप छानसा स्थैर्या चा अनुभव होईल. लहान मुल हा पॉईंट लगेच मिळवू शकतात तर १५-२५ वयोगटाला थोडा वेळ लागतो कारण मनामध्ये चंचलता असते. २५ ते ४० याना थोडे अवघड जाते. ४० आणि वरचे वयोगट ज्यांनी कधीच व्यायाम नाही केला त्यांना मात्र हे खूप अवघड वाटते. हा वयोगट लवकर गिव्ह-उप करतो. म्हणून लहान असताना ध्यानसाधना आणि योग विद्या योग्य वेळी शिकवणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे त्यांना काही हि अवघड वाटणार नाही. ४० व वरील वयोगटानी झोपण्या आधी, नियमित १० मिनिट ध्यान साधना केली तरी त्याचे भरपूर फायदे होतात. झोपण्या आधी ध्यान साधना करून लगेच झोपून जायचे. त्या आधी तुमचे घड्याळ सेटिंग किंवा दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवायची. दिवा बत्ती नंतर सगळी क्लोजिंग ची काम करायची. ध्यान करून झोपल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तुमचे ९९.९९% आजार शारीरिक आणि मानसिक इथेच बरे होतात. शांत झोपल्याने. काही काळानंतर. तुम्हाला आत्मसंतुलन म्हणजेच मेडिटेशन पॉईंट वॉर पोहोचता येईल. प्रक्रिया आणि त्याचे परिणाम लक्ष्यात घेऊन केलं तर कुठली हि गोष्ट सहज होते. त्यामुळे घाबरून न जाता शास्त्स्रोयुक्त पद्धतिने ध्यान साधना केल्यास अशक्य असे काही नाही.
हा तुमच्या ध्यानाचा किंवा मानसिक उपचारांचा केवळ पहिला टप्पा आहे. हा प्रवास खूपच जादुई आणि रहस्यमय आहे. मी तुम्हाला एक चित्र देणार आहे, ते इंटरनेटवर शोधा, त्याचे स्पष्टीकरण मिळवा आणि ध्यानावस्थेत ते पाहिल्यावर त्याचा काय अर्थ होतो ते बघा. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर ध्यान आणि क्राउन चक्राचे इतर अनुभव देखील पोस्ट केले आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही ध्यानाचा सराव सुरू करावा. तुमचे जीवन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या कसे बदलते ते पहा. त्यानंतर तुम्ही ते अनुभव जाऊन पहा. आपला मेंदू आपल्या शरीराचा किती शक्तिशाली पण साधा अवयव आहे, हे तुम्हाला समजेल. तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्याच्या आणि मेंदूला योग्य पोषण व संसाधने मिळाल्यावर आयुष्य किती सुंदर असू शकते हे पाहण्याच्या तुमच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे. तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि त्याचा तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर हळूहळू दिसू लागतील. काही गोष्टी अनुभवातूनच शिकाव्या लागतात. जर तुम्ही त्या दिशेने एक पाऊलही उचलले नाही, तर तेतुमच्या जीवनात ते बदल घडताना तुम्हाला कसे दिसतील? जर तुम्ही मोठ्या संकटात असताना आणि आशेचा किरण दिसत नसताना हा ब्लॉग वाचत असाल, तर फक्त थोडे ध्यान करा आणि बघा की तुमच्यासाठी गोष्टी कशा पुन्हा जुळून येऊ लागतील. भीती वाटणे, थकवा येणे, मरगळ येणे, राग येणे, बोलायला कोणी नसणे या सर्व भावना सामान्य आहेत. जर तुम्ही संघर्ष करत असाल, तर प्रत्येक नकारात्मक भावना तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. योग्य आहारपद्धती, मनातील सकारात्मक विचार, समाजाप्रती जबाबदारी, आत्मजागरूकता आणि एक चांगली सजग जीवनशैली जपल्यास, तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे ते मिळेल. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कॉमेंन्ट द्वारे कळवा. आरोग्य आणि जीवनशैली वर आधारित लवकरच अनेक ब्लॉग, व्हीडीएओ आणि पॉडकास्ट येणार आहेत. याची सूचना मी वेबसाइट आणि फेसबुक पेज वर करणार आहे तर नक्की सोबत राहा!
