kitesurfer on body of waterPhoto by Jean van der Meulen on <a href="https://www.pexels.com/photo/kitesurfer-on-body-of-water-1559392/" rel="nofollow">Pexels.com</a>

टर्की मध्ये असंख्य सुंदर सामुद्रि किनारे आहेत. साधारण ०३ महिने इथे उन्हाळा असतो. तेव्हा इथल्या सुंदर बीचेस वर पर्यटकांची गर्दी असते. अश्याच एका बीच वर आम्ही सबंध दिवस मज्जा केली. भरती च्या वेळीस इथे काईट (पतंग) सुर्फिंग चालते. म्हणजेच पतंगीच्या साहाय्याने किनाऱ्यावरच्या लाटण वर भरती च्या वेळेस हा आडवेंतुरे स्पोर्टस चालतो. टर्कीच्या किनारपट्टी वर जास्तीत जास्त उथळ समुद्र आहे त . म्हणजेच जिथे आपण पोहू शकतो आणि मस्त थंड हवा आणि गरम पाण्याची मज्जा घेऊ शकतो. इस्तान्बुल पासून तासाभराच्या पेक्षा कमी अंतरा वर(०४ चाकी वाहनांमधून जाताना)आहे किलियॉस बीच आहे. इथे अनेक बिचेस आहेत कोणत्या ही बिच वर जाऊन तुम्ही दिवस घालवू शकता. काही बिचेस वर एन्ट्री फ्री आहे. तर काही बिचेस वर छोटा मोठा शुल्क आहे. पर्यटन स्थळ असल्या मुळे भाषेचा प्रॉब्लेम सहज सहजी येत नाही. तुम्ही इंग्रजी भाषेचा वापर करू शकता. काही बिचेस वर तुम्ही तुमचा जेवण न्हेऊ शकता किंवा तिथे असेल तेच जेवण विकत घेऊ शकता. टर्कीच्या सगळ्या सणांना ओपन डायनिंग चालू असते व सगळे पेय पाधारत घेऊ शकता. स्वच्छते बाबतीत इथे चांगले नियम आहेत. खाण्या पिण्याचे उरलेले सामान समुद्रात न टाकता ते व्यवस्थित डिस्पोज केले जाते.   

मला काही अजुन व्यवस्तीत पोहता येत नाही. पण समुद्र किनाऱ्यावरच्या लाटा नेहमीच आपल्याला खेचून घेत असतात. मी किनाऱ्या वर राहून मस्त लाटांची मज्जा घेतली आणि थरारक काईट सुरफींग बघण्याचा अनुभव घेतला. बुर्ज बिच वर (किलियोस मधील अनेक बिचेस पैकी एक बुर्ज बिच आहे.) काइट बोर्ड सुर्फिंग क्लब सुद्धा आहेत. तिथे तुम्ही जाऊन या अडव्हेंटचरचा आनंद घेऊ शकता. या बीच वर जाण्याचा रस्ता बोआजची (Boğaziçi University, g silent) युनिव्हर्सिटी मधून आहे. सेक्युरिटी असल्या मुळे आम्ही हा बीच निवडला. मी इथे स्थानिक म्हणून भाषा सुद्धा बोलू शकत होती व आम्ही स्वताःचे वाहन घेऊन गेलो होतो. किंवा भारतीय ड्रायविंग लायसेन्स वर तुम्ही कार रेंट करू शकता आणि चालवू शकता. जर तुम्ही टुरीस्ट असाल तर सिटी सेन्टर पासून सरियर च्या दिशेने जाणाऱ्या बस मध्ये आरामात जाऊ शकता. बस मध्ये विचारल्यास ते तुम्हाला कुठे उतरायचे ते सांगतील. त्याबाबतीत टर्किश मंडळी मदत करतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ते आपल्या कडे रागाने वगैरे बघत आहेत. पण त्यांच्या सोबत बोलतांना जाणवत कि ते खूप मदतगार सामान्य लोक आहेत. जिथे बस उतरवेल तिथे तुम्हाला छोटी गाडी मिळेल. माणसी लिरा आकारून पाहिजे त्या बीच वर नेऊन सोडतील. सरियर ला तुम्ही फेरी म्हणजे वपूर (vapur) ने सुद्धा जाऊ शकता. एकच ट्रॅव्हल कार्ड सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी लागेल. परतण्याच्या वेळा मात्र नक्की करून ठेवा. बस चे वेळापत्रक बघून ठेवा. कारण आम्ही या आदी इथे मत्रिणी मैत्रिणी गेलो होतो. वेळापत्रक बघुनही शेवटची बस चुकली. शेवटची बस नाही चुकवली मग काय मज्जा केली ना ? आम्ही शेवटची बस चुकली. असा म्हंटल्या वर तुम्हाला धावत जाण्याऱ्या ०३ मुली डोळ्या पुढे दिसल्या असतील पण आमची स्थिती त्यात पेक्षा वाईट होती. तसं असतं तर बस चालकाने नक्की बस थांबवली असती. तुम्ही जर मला इंस्टाग्राम 03kanchan वर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे माहित आहे कि हे मी इथे नेहमी केलं आहे. नवरा गाडी घेऊन परत घ्याला येईल असं काही शक्य नव्हते कारण जरी अंतर, तासा भरापेक्षा कमी असलं तरी संध्याकाळी खूप सारे सिग्नल मुळे ट्रॅफिक कोंडी होते. भाषा येत असल्या मुळे आम्ही एका जोडप्या कडे लिफ्ट मागितली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला जवळच्या मेट्रो स्थानकावर उतरविण्यास तयार झाले. पॉश गाडी मध्ये वाळू भरले कपडे. तयातून आम्ही परदेशी नागरिक काय विचार करतील, म्हणून कपडे बराच वेळ झटकून वृत्तपत्र अंथरून गाडीत बसलो. पर्यटक असताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. धर्म, पॉलिटिक्स, जेन्डर, आवड निवड अश्या अनेक विषयांवर तुमचे जरी ठाम मत असलले तरी परदेशात असताना भाषा नेहमी सौम्य, आदरार्थी आणि त्यापेक्षा ज्यास्त न्यूट्रल असणे गरचेचे आहे . उदाहरणार्त ज्यांनी आम्हाला लिफ्ट दिली होती ते टर्कीश डॉक्टर जोडपे होते. म्हणून त्याना इंग्रजी भाषा येत होती. त्यानीं आम्हाला विचारलं की तुम्हाला भारतीय नागरिक म्हणून टर्की देश कसा वाटला? मला तर हा देश निसर्ग आणि संस्कृतीनने समृद्ध वाटला म्हणून मी तास म्हंटलं. तर आमच्यातला एका मुलीने थेट तिसऱ्या देशाचे नाव घेत म्हंटलं आम्हाला तर तिकडे जायचे आहे. या वाक्यामुळे त्यांचं मन थोडे आमच्या प्रति उडाल्या सारखा झालं. मैत्रिणाला चिमटा काढून गप बसवला आणि आम्ही इथे काय काय मज्जा करतो, कोणत्या लोकल टर्किश गोष्टी आम्हाला खायला आवडतात, कुठे फिरते हे सांगून त्यांना परत पोहचे पर्यंत मन वळवण्याचा प्रयत्न केला. इथे त्यांना कुतूहल असतं एक तर शाकाहारी भारतीयांचे व दुसरे मांसाहारी भारतीयांच्या निवडीचे. त्यामुळे. अश्या सगळ्या संवादामध्ये तुमची बाजू मांडताना ती योग्य रित्या मांडणे फार आवश्यक आहे. स्वतःच्या मायभूमी मध्ये राहत असताना तर आपण खूप मज्जा करतोच पण त्या सिमे बाहेर जेव्हां आपण पडतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे जग अनुभवायला मिळते. कोणत्या प्रश्नावर रिऍक्ट न करता त्याला योग्य प्रकारे समजून घेऊन त्याचे उत्तर दिले तर लोक तुमच्या सोबत चांगल्या प्रकारे मिसळू शकता. कदाचित आमहा तिघीं ची वागणूक हि त्या जोडप्या साठी भारतीय नागरिकांवर मत घडवू शकते.   

  पूर्वी पार चालत आलेल्या भारतीय नागरीकां बद्दलचे कुतूहल वेगळे आहे. भारतीय नागरिक हा एक सुजाण, सुसंस्कृत, सभ्य आणि जागा पेक्षा ०४ पावलं पुढे असतो. असे परदेशात राहणाऱ्या लोकांना भारतीयां बद्दल नेहमी वाटते. मला लहान असताना नेहमीच वाटायचे कि आपण जे अनुभव घेण्यासाठी परदेशात जातो. तर अशी कोणती गोष्ट आहे जी बघण्या साठी परदेशी पर्यटक भारतात येत असतील? निसर्ग सौन्दर्य तर आहेच पण त्यांच्या कडे असणाऱ्या सुखं सुविधा आपल्या कडे नाहीत. मग नेमका काय बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी हे पर्यटक आपली कडे येत असतील? याच उत्तर मला भारता बाहेर राहून समझल. कदाचित हा तो अनुभव आहे ज्या शब्दात सांगता येत नाहीत. परदेशी पर्यटकांना भारतात आल्या नंतर बऱ्याच अडचणी असता. ते आपल्या कडे खूप मोठ्या अपेक्षा घेऊन येतात. अशी बरीच परदेशी मंडळी मला भेटली आहेत जे आयुष्यात पैश्यांची विकत घेतायेईल अशी सर्व सुख -सोई, मौज – मज्जा करून झाल्या आहेत. हीच मंडळी नंतर अध्यात्मिक वृद्धी साठी आध्यत्मिक शांती साठी भारताला भेट देतात. काहींना नुसती माहिती असते. ती म्हणजे भारताची विशाल समृद्धी. अश्या वेळीस जेव्हा त्यांच्या देशात ते आपल्याला आपण पर्यटक म्हणून भेटतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्या कडून माहिती करण्याचा प्रयत्न करतात. अश्या वेळी. तुमचा छोटा संवाद त्यांना अखंड भारतभुमीची झलक देणारा असतो. जेव्हा कधी तुम्ही पर्यटनासाठी कुठे हि जाल तेव्हा तुम्हाला हा अनुभव तुमच्या सोबत झाल्येल्या संवादात नक्की येईल.   

प्रत्येकाला पर्यटक म्हणून निरनिराळे अनुभव आवडतात. मित्र मैत्रिणीच्या सोबत तर हि मज्जा वेगळीच असते(होताना नाही. होऊन झाल्यावर सांगताना. वर्तमान नाही – भूतकाळात). बस चुकणे , रस्ता हरवणं. पसे संपणे, वस्तू हरवणं, खरचटण, धडपडणं, फुकट मध्ये जेवण किंवा लिफ्ट घेणं हे तर सगळ्यांनाच आवडतेच. त्या जोडप्याला आमच्या मध्ये तो अल्हड पणा तर दिसलाच असेल पण त्या सोबत बिनधास्त मज्जा करणाऱ्या मुली सुद्धा दिसल्या असतील. भारतीय असणं हि आपल्या खांद्यावर एक मोठी जवाबदारी आहे. आपल्यासारखीच आहेत हे भारतीय पण. तरी किती वेगळे आहेत ! त्यातून मराठी म्हणजे विचारूच नका.
इथे बराच काही आहे अनुभवण्या सारखं अप्रतिम सुंदर निसर्ग, विविध खान पान, संस्कृती. एक सांगायचं राहून गेलं समुद्राचं पाणी छान पारदर्शक आहे. तर उंडरवॉटर फोटोग्राफी आणि स्नोर्केल्लिंग चा अनुभव जगा वेगळाच आहे. कधी कधी एखादा जेली फिश सोबर पोहताना दिसेल. इथे समुद्र सफाई सुद्धा चालू असते आणि नागरिक सुद्धा सुजाण आहेत. मास्यांसोबत पोहण्या साठी तुम्हाला स्कुबा डायविंग ची आवशकता नाही लागणार. समुद्र किनाऱ्यावर पोहताना सुद्धा तुम्हाला पारदर्शक पाण्यामध्ये छोटे मोठे मासे किंवा कासव दिसून येतील. खरंच स्वर्गीय आहे हा अनुभव. आयुष्यात एकदातरी नक्की घ्यावा.  

टर्कीच्या दक्षिणेकडील किनारपट्टी जितकी अप्रतिम सुंदर आहे तितकीच उत्तरी किनारपट्टी सुद्धा सुंदर आहे. या दोन्ही प्रदेशात म्हणजेच उत्तरे कडे ब्लॅक सी व दक्षिणे कडे भूमध्य समुद्र. या प्रवासाचा अनुभ सुद्धा मी मराठी आणि इंग्रजी मधून वाचकां पर्यंत आणणार आहे. बरेच ब्लॉग इंगागी भाषेत प्रकाशित आहेत. तुम्हाला माझ्या ब्लॉग्स बद्दल काय आवडल? तुम्हाला माझ्या विडोईस मध्ये अजून काय पहायला आवडेल ते मला नक्की कमेंट द्वारे लिहून कळवा.

  नवीन ब्लॉग्स च्या अपडेट्स साठी किंवा नवीन ब्लॉगची नविन लिंक मी नेहमी इंस्टाग्राम मध्ये किंवा फेसबुक पेज वर टाकत असते. नक्की वाचा! या अनुभवातले टिपलेले छायाचित्र आणि ध्वनीचित्रण तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेल वारी The divine Journey! किंवा फेसबुक पेज वारी The divine Journey! यावर पण बघू शकता. काही गमतीदार छायाचित्र माझ्या इंस्टाग्राम 03kanchan वर सुद्धा बघायला मिळतील.   

वारी – अनुभव प्रवासाचा आणि प्रवास जीवनाचा !
गणी गोमी

किलियॉस – बुर्ज बिच – इस्तंबूल – टर्की

03kanchan's avatar

By 03kanchan

Hi, I’m the founder of Ganigomi. I hold a Master of Science degree in Geology, and my journey has taken me across diverse fields that continue to shape my perspective. I worked for more than six years in the technology sector and four years in the (diverse)education field, experiences that helped me build both a practical and people-centered approach. Alongside this, I am an amateur artist with a deep love for creativity, culture, and meaningful expression. I am also a practicing yogi and a yogic teacher. For over seven years, I have worked closely with individuals—primarily patients—guiding them through yoga and mindful healing practices. I conduct chakra meditation and healing sessions in different parts of the world, focusing on balance, awareness, and inner well-being. I believe in living a sustainable and conscious life. I am deeply inspired by traditional art forms from around the world and the stories they carry. My vision is to create a bridge for artists in all forms—connecting creators, preserving traditions, and helping their work reach a wider audience. My approach is spiritual, friendly, and grounded in purpose. Through Ganigomi, I aim to create opportunities where businesses, artists, and individuals can grow with authenticity, visibility, and a positive impact. Me in one line: I never get bored!

Leave a Reply

Discover more from GaniGomi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading